Headlines

“न्यायालये उडवून देण्याच्या धमकीने खळबळ; वकील संघटनेने केला निषेध…

⚡सावंतवाडी, ता.०२-: महाराष्ट्रातील विविध न्यायालयांच्या संकेतस्थळांवर ई-मेलद्वारे बॉम्बचा वापर करून न्यायालये उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

न्यायालयीन कामकाजात विनाकारण व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या धमकीच्या प्रकारामुळे वकील, न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, अशा धमक्यांना घाबरून न जाता न्यायालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे आवाहन जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. वकील बंधू-भगिनींसह न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयम राखून आपले नियमित कामकाज सुरू ठेवावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले”

You cannot copy content of this page