जिल्हाध्यक्ष इरर्शाद शेख यांची माहिती
⚡ओरोस ता.३०-: मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.
