Headlines

आडेली कामळेविर धरणातून आजपासून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग….

पं. स. सदस्य नितीन मांजरेकर यांच्या कार्यतत्परतेबद्दल शेतकऱ्यातून समाधान व्यक्त

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेविर कार्यक्षेत्रात शासनातर्फे कार्यान्वित असलेल्या आडेली कामळेवीर विस्तीर्ण धरणातून आज शुक्रवारपासून दुपारी अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
तालुक्यातील आडेली कामळेवीर येथील धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणुन धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रणच्या दृष्टीने अंमलबजावणी करून
आज विसर्ग करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग कुडाळ कार्यकारी अभियंता एस. एच. महाले, अन्य अधिकारी, आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान याबाबत आडेली कामळेवीर, झाराप कामळेवीर तसेच नजीकच्या गावातील नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी केले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने यंत्रणा कार्यरत करून ही अंमलबजावणी केल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page