वामन पंडित;आचरेकर प्रतिष्ठान आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा शुभारंभ
⚡कणकवली ता.३०-: कोणतीही कला शिकणे ही कष्टप्रद गोष्ट आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. समीर दुबळे हे आपल्या गुरुंच्या शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाचा वसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत.
सिंधुदुर्गातील संगीत प्रिय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवण्याचे पं. समीर दुबळे करीत आहेत. त्यांच्या शिष्यांनी देखील पंडित जीतेंद्र अभिषेकी यांची शिकवण आत्मसात करून त्यांच्या शास्त्रीय संगीतामध्ये
स्वत:चा दबदबा निर्माण करावा, असे आवाहन वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन
पंडित यांनी केले.
कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलिच पंडित जीतेंद्र अभिषेकी सधन गान शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सधन गान शिक्षण केंद्राचे गुरु पंडित समीर दुबळे यांना त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक
मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प
-संगी ते बोलत होते. यावेळी पंडित समीर दुबळे, सुजाता जोशी, प्रादेश जोशी, बाळ
नाडकर्णी, कार्यवाह नानू देसाई, सदस्य लीना काळसेकर, प्रसन्ना देसाई, मिलिंद बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पंडित म्हणाले, पं. जीतेंद्र अभिषेकी यांचे शिष्य समीर दुबळे यांनी १५ वर्षांपूर्वी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सहकार्यातून सिंधुदुर्गातील संगीत प्रिय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली होत
त्यातूनच पंडित जीतेंद्र अभिषेकी सधन गान केंद्राची स्थापना झाली असून या केंद्राच्या माध्यमातून संगीत क्षेत्राची आवड असलेले विद्यार्थी शास्त्रीय संगीताचे धडे
देत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. आरंभी पंडित जीतेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण
अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांना पुष्प व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत
वामन पंडित यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात दामोदर खानोलकर, सीमा
कोरगावकर, किरण गायकवाड, रविराज काळे, संतोष देशमुख, उमेश परब, ऋषा कशाळीकर, डॉ. समीर नवरे, विश्रांती कोयंडे, मनोज मेस्त्री, ईश्वरी तेजम यांनी गायन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
