सावंतवाडीत बबन साळगावकर यांनी केला आ.वैभव नाईक यांचा गौरव

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पुस्तक भेट देत आ.वैभव नाईक यांचा गौरव केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 आ.वैभव नाईक यांच्यासारखे सामान्य शिवसैनिक आज शिवसेनेच्या कठीण काळात शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना बळ येईल. निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे येत असून त्यांचे स्वागत आपण स्वतः करणार असल्याचेही बबन साळगावकर यांनी यावेळी सांगितले.
You cannot copy content of this page