पेंडूर प्राथमिक शाळांमध्ये मुलांना रेनकोट वाटप

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे यांचा उपक्रम

⚡कणकवली ता.३०-: सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत पेंडूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले. या संस्थेचे सभासद संतोष पुजारे यांच्याशी सुमित सावंत यांनी संपर्क साधत आपल्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या गावातील मुलांना सुद्धा आपण रेनकोट उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली होती. यावेळी श्री पुजारे यांनी गावातील 52 विद्यार्थी यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे रेनकोट प्रत्यक्ष गावात जाऊन उपलब्ध करून दिलेत.
संस्थेविषयी माहिती देताना अध्यक्ष श्री देसाई म्हणाले, पैश्यामुळे किंवा शैक्षणिक साहित्याच्या कमतरतेमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, या हेतूने समाजात आम्ही काम करत आहोत भविष्यात देखील काही मदत अश्या एखाद्या गरीब होतकरू मुलाला लागल्यास अवश्य आम्हला कळवा जेवढी जास्त मदत करण्यात येईल तेवढी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करू असे प्रतिपादन श्री देसाई यांनी दिले.
यावेळी सरपंच सौ सुनिता मोरजकर, अध्यक्ष सचिन देसाई, संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी , संयोजक प्रसाद देसाई, संस्थेचे सभासद संतोष उर्फ पप्पू पूजारे ,सदानंद चव्हाण ,अभिषेक देसाई, गावातील ग्रामस्थ अमित सावंत, ग्राम पंचायत सदस्य शैलेश परब, नेहा परब, सुमित सावंत, मोहनिश प्रभू, नंदू परब, चेतन वालावलकर, अनिल पाटील व शिक्षक श्री सागर गरड व चव्हाण उपस्थित होते.

You cannot copy content of this page