Headlines

युवकांना भावणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करण्याचा प्रयत्न…

कृष्णराज महाडिक :भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची मालवणला भेट.. ⚡मालवण ता.२७-:भाजप युवामोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेचा कोकण प्रांतातील दौरा यशस्वीरित्या पार पडला आहे. या जागर यात्रेतून युवकांना भावणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करण्याचा प्रयत्न होणार आहे. कोकणचा अतिशय सुंदर कोकण दौऱ्याचा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मालवण…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून वजराट गावात विविध विकासकामे मंजूर…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातीलवजराट गावात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची भूमिपूजने सोमवारी 27 एप्रिल रोजी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते संपन्न झाली. ग्रामपंचायत वजराट मधील इलेक्ट्रिक वीस पोलचे कन्वर्जन करणे साठी 5 लाख रुपये निधी, वजराट परबवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणेसाठी 17 लाख रुपये…

Read Full News

गोसंवर्धनासाठी कठोर कायदे व ठोस उपाययोजना कराव्यात…

⚡मालवण ता.२७-: देशभरातील गोभक्त, संत समाज व सजग नागरिकांच्या वतीने सुरू असलेल्या गो सन्मान आह्वान अभियान अंतर्गत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण निवेदन तहसीलदार, मालवण यांच्या मार्फत आज सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे भारतीय संविधानातील अनुच्छेद ४८ व ५१ अ (ग) च्या भावनेनुसार देशातील गोवंशाला “राष्ट्रमाता/राष्ट्रीय वारसा” असा संवैधानिक दर्जा देण्याची…

Read Full News

महिला आरक्षण लागू करण्यासाठीमालवणात काँग्रेसच्या पोस्टकार्ड अभियानाचा एल्गार…

⚡मालवण ता.२७-:केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर केलेले ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक कागदावरच न ठेवता त्याची अंमलबजावणी ‘आज आणि आत्ता’ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी देशभर राबवल्या जाणाऱ्या ‘पोस्टकार्ड अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शुभारंभ आज मालवण वायरी येथून करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केंद्र सरकारच्या…

Read Full News

पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात…

⚡कुडाळ ता.२७-: पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी भूपकरवाडी येथे रस्त्यालगत बोलेरी पिक अप जीप उभी करून ठेवण्यात आली होती. समोरून पिंगुळी म्हापसेकरतिठ्याच्या दिशेने…

Read Full News

मठ श्री देवी सातेरीचातृतिय वर्धापन दिन उद्यापासून…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठश्री देवी सातेरी आणि परिवार देवतांचा पुनः प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा तृतीय वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. श्री देव स्वयंभू पालखी तसेच तरंगदेवांचे आगमन,सकाळी १० वा. गणेश पूजन, समस्त देवदेवतांना आवाहन,सकाळी ११ वा. समस्त मानकरी, गावरयत आणि यजमान यांच्या…

Read Full News

वेंगुर्ला श्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा उद्या…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी भराडी मंदिर वेंगुर्लाश्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 28 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी भराडीची विधियुक्त पाद्य पूजा लघुरुद्र व अभिषेक,सकाळी ९ वा.सुवासिनींसाठी कुंकूमार्चन,सकाळी १०.३० वा. सत्यनारायण महापूजा,दुपारी १२.३० वा. महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी४ वा. गोवा भजन मंडळ यांचे संगीत…

Read Full News

कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…!

श्री स्वयंभू मंदिरात 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन…! ⚡कणकवली ता.२७-:शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळ पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 5.30 वाजता निमंत्रित भजन मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली आहे.1 मे रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी,…

Read Full News

कासर्डे येथील आनंद नगरमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा…

⚡कणकवली ता.२७-:कणकवली तालुक्यातील कासर्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर (कासर्डे) येथे संशयित आरोपी अजित रामचंद्र नकाशे (वय ४९, रा. कासर्डे) हा लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मुंबई मटका’…

Read Full News

आजीच्याच घरावर दरोडा टाकणाऱ्या नातवासह साथीदाराना दोन दिवसांची पोलीस कोठडी…

⚡कणकवली ता.२७-:तालुक्यातील ओटव – ओटववाडी येथे वृद्ध महिलेला धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची जबरी चोरी करणाऱ्या नातवासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) मीरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० च्या सुमारास सुवर्णा नारायण रावले (वय ६६) या…

Read Full News

You cannot copy content of this page