Headlines

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आमचा नेहमी प्रयत्न…

भूषण पोकळे:ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन ; पडेल ग्रामपंचायतीचा उपक्रम ठरतोय मार्गदर्शक.. ⚡देवगड ता.२७-:आजच्या स्पर्धात्मक युगात शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळायला हव्यात. योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास यांच्या जोरावर हे विद्यार्थी कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा…

Read Full News

किडनी प्रत्यारोपणासाठी सुनेश गवसला गणेशोत्सव मंडळाची २१ हजारांची मदत…

⚡बांदा ता.२८-: बांद्याच्या बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने झोळंबे येथील युवक सुनेश गवस याला उपचारासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने रोख रुपये २१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गवस कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुनेश गवस याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यासाठी…

Read Full News

निकृष्ट कामे करणाऱ्यांवर आमदार कारवाई करणार का…?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल.. कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा अधिकारी वर्गाने गांभीर्याने घेतलेली नाही, अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली. आमसभा स्वागतार्ह आहे, परंतु मतदारसंघातील विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी विभागीय आढावा घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कार्यकर्त्यांमार्फत होणारी निकृष्ट कामे यावर आमदार निलेश राणे कारवाई…

Read Full News

दोडामार्गात ‘गो-सन्मान’साठी भव्य मोर्चा…

⚡दोडामार्ग,ता.२८-:“चलो दोडामार्ग…” या घोषणांनी तालुका दणाणून सोडत सोमवारी गो-सन्मान अभियानांतर्गत भव्य मोर्चा उत्साहात काढण्यात आला. पिंपळेश्वर बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले. मोर्चात मोठ्या संख्येने गोप्रेमी, नागरिक तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.गो-सन्मानासाठी ठाम भूमिकाया आंदोलनातून केंद्र सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला….

Read Full News

दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारूसह कार जप्त; एकाला अटक..

⚡दोडामार्ग ता.२८-: दोडामार्ग ते तिलारी मार्गावरील घाटमाथ्यावरून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा गोवा–दोडामार्ग चेकपोस्टदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एका कारमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.या प्रकरणी प्रसाद शंकर गुणाजी (वय ३०, रा. लक्ष्मी गल्ली, हलगा, व्ही.टी.सी., ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात…

Read Full News

तापमानातील वाढीमुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवा…

दुरुस्ती कामाच्या भागातीलच वीज पुरवठा बंद ठेवा :जावेद खतीब यांची मागणी. ⚡बांदा ता.२८-:दुरुस्ती व साफसफाईची कामे सुरू असल्याची बतावणी करून इन्सुली उपकेंद्रातर्गत संपूर्ण गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून वृद्ध, रुग्ण, नवजात बालक, गर्भवती महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने ज्या भागात दुरुस्तीची कामे सुरू असतील त्याच…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा १ मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.२८-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने संस्थेच्या बहुप्रतिक्षित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक कै. आबा उर्फ अनिल परुळेकर यांनी काही वर्षांपूर्वी पाहिलेलं रुग्णवाहिकेचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. “एक सेवाभावी उपक्रम” या…

Read Full News

टेबे स्वामी पादुका मंदिराचा ११० वा वर्धापन दिन सोहळा आज

⚡सावंतवाडी ता.२८-: सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी मंदिर यांच्यावतीने श्री टेबे स्वामी पादुका मंदिराचा ११० वा वर्धापन दिन सोहळा आज मंगळवार, २८ एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना असलेल्या या मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला…

Read Full News

रेडी येथील श्री देव कुळकार मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आज…

श्री देवी माऊलीची पालखी व बारा पंचायतन देवतांची भेट याची आठवण म्हणून धार्मिक विधी सोहळा ⚡वेंगुर्ले ता.२८-: श्री कुळकार मंदिर, रेडी गावतळेवाडी येथे आज मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी “श्री देव कुळकार मंदिराचा वर्धापन दिन सोहळा” मोठ्या उत्साहात साजरा होत असून ,सकाळ पासूनच मंदिरात धार्मिक विधी,त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा,आरती व महाप्रसाद, सायंकाळी भजने तसेच रात्रौ…

Read Full News

डीसीए परीक्षेत ओझर विद्यामंदिरचे यश..

⚡मालवण ता.२७-:डॉट कॉम असोसिएशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डीसीए परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे. यामध्ये इयत्ता सहावी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील स्मृती उदय परब हिने २०० पैकी १५६ गुण मिळवून जिल्ह्यात पाचव्या स्थानी येण्याचा मान व गोल्ड मेडल पटकावले….

Read Full News

You cannot copy content of this page