Headlines

सनातन संस्थेला बॅ. नाथ पै सभागृह विनामूल्य देण्याचा ठराव पालिका कौन्सिल मध्ये मंजूर…

संजू परब यांनी केली होती मागणी: नगराध्यक्षांनी दिली सहमती..

सावंतवाडी, ता. ९ : बॅ. नाथ पै सभागृह सनातन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक संजू परब यांनी गुरुवारी झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या मागणीला सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही समर्थन दिले.

सभागृह वापरासाठी पाच हजार रुपये भाडे आकारण्याबाबतचा प्रस्ताव यावेळी चर्चेस आला होता. मात्र, यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर बहुसंख्य सदस्यांनी सनातन संस्थेला सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी सनातन संस्थेला बॅ. नाथ पै सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संबंधित प्रस्तावास सभागृहाची मंजुरी मिळाली.

You cannot copy content of this page