१८ जुलै रोजी रक्तदान शिबिर, वह्या व धान्य वाटप; संजू परब यांची माहिती..
⚡सावंतवाडी, ता. ९ -: आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संजू परब म्हणाले की, १८ जुलै रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, गरजू व गोरगरीब कुटुंबांना धान्य वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही संजू परब यांनी केले.
