कणकवली : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ आणि शाळा क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला तरंदळे गावचे सरपंच सुशील कदम, सावली जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष पप्पू पुजारे, सचिव सदा चव्हाण, सावंत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असून भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
