Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान, प्रमोद जठार पुन्हा एकदा आमदार…

भाजपकडून विधान परिषदेवर संधी:प्रामाणिकपणाची संघटनेकडून दखल.. कणकवली : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कोकणातून प्रमोद जठार यांना संधी दिल्याने राणे समर्थकांसह भाजपच्या निष्ठावंत गोटातून आनंद…

Read Full News

नऊ वर्षांनंतर मालवणात आमसभा संपन्न…

ग्रामीण-शहरी विकासकामे लवकर मार्गी लावण्याचे निर्देश; पुढे दरवर्षी आमसभा घेऊन कामांचा आढावा घेणार;आमदार निलेश राणे. ⚡मालवण ता.२८-:मालवण तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजच्या आमसभेत मांडले गेले आहेत या आमसभेत झालेले विषय हे सभेपूरते मर्यादित न राहता त्यावर तोडगा काढून त्या प्रश्नाचे निवारण झाले पाहिजे यासाठी अधिकारी वर्गाने कामाचा टाईम बॉण्ड…

Read Full News

काँग्रेसच्या महिला मालवण तालुकाध्यक्षपदी प्राची माणगावकर व शहरध्यक्षपदी रुपाली फर्नांडिस यांची नियुक्ती..

⚡मालवण ता.२८-:मालवण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी वायरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्राची माणगावकर यांची आणि मालवण शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी रुपाली जेम्स फर्नांडिस याची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली. प्राची माणगावकर या वायरी ग्रामपंचायतच्या सदस्य व उपसरपंच असून त्या गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. तर शहर…

Read Full News

रडत रखडत चाललेल्या मसुरे डांगमोडे- बेलाचीवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे…

मसुरे डांगमोडे ग्रामस्थानी वेधले आमदारांचे लक्ष.. ⚡मालवण ता.२८:-मसुरे डांगमोडे – बेलाचीवाडी या रस्त्याचे काम गेला महिनाभर ठप्प आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे रस्ता काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे असून ठेकेदाराने योग्य ते पाऊल न उचलल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, त्यामुळे याबाबत आमदार निलेश राणे यांनी…

Read Full News

विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न…!

⚡दोडामार्ग, ता.२८-: विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने मान. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रशिक्षण शिबिर दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर २४ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडले. श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा, वंदूर (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात शाळेतील तसेच…

Read Full News

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ५९.९९ टक्के मतदान…

ओरोस ता २८ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदान झालेल्या एकुण १४ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ७४३ मतदार पैकी ६ हजार ७५३ एवढया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ५२.९९ टक्के मतदान झाले आहे. सरपंच पदासाठी कुडाळ मधील कालेली ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक ५९.५१ टक्के मतदान झाले.राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा…

Read Full News

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आमचा नेहमी प्रयत्न…

भूषण पोकळे:ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन ; पडेल ग्रामपंचायतीचा उपक्रम ठरतोय मार्गदर्शक.. ⚡देवगड ता.२७-:आजच्या स्पर्धात्मक युगात शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळायला हव्यात. योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास यांच्या जोरावर हे विद्यार्थी कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा…

Read Full News

किडनी प्रत्यारोपणासाठी सुनेश गवसला गणेशोत्सव मंडळाची २१ हजारांची मदत…

⚡बांदा ता.२८-: बांद्याच्या बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने झोळंबे येथील युवक सुनेश गवस याला उपचारासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने रोख रुपये २१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गवस कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुनेश गवस याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यासाठी…

Read Full News

निकृष्ट कामे करणाऱ्यांवर आमदार कारवाई करणार का…?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल.. कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा अधिकारी वर्गाने गांभीर्याने घेतलेली नाही, अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली. आमसभा स्वागतार्ह आहे, परंतु मतदारसंघातील विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी विभागीय आढावा घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कार्यकर्त्यांमार्फत होणारी निकृष्ट कामे यावर आमदार निलेश राणे कारवाई…

Read Full News

दोडामार्गात ‘गो-सन्मान’साठी भव्य मोर्चा…

⚡दोडामार्ग,ता.२८-:“चलो दोडामार्ग…” या घोषणांनी तालुका दणाणून सोडत सोमवारी गो-सन्मान अभियानांतर्गत भव्य मोर्चा उत्साहात काढण्यात आला. पिंपळेश्वर बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले. मोर्चात मोठ्या संख्येने गोप्रेमी, नागरिक तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.गो-सन्मानासाठी ठाम भूमिकाया आंदोलनातून केंद्र सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला….

Read Full News

You cannot copy content of this page