Headlines

वन्यजीव सप्ताह निमित्त पाट हायस्कूल मध्ये चित्रकला स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.०८-: मुलांमध्ये वन्यजीवाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन वनविभाग मार्फत करण्यात आले होते यातच एक भाग म्हणून पाट हायस्कूलमध्ये मुलांसाठी मार्गदर्शन वर्ग व चित्रकला स्पर्धांचा आयोजन करण्यात आले . इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला . विविध प्राण्यांची चित्रे मुलांनी रेखाटली यावेळी वनरक्षक श्री रोहित माईनकर यांनी मुलांना मार्गदर्शन…

Read More

बांदा येथे ९ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.०८-: रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही काणेकर कुटुंबियातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री साईबाबांचा ऊत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवला ६९ वर्षे पूर्ण होत आहे. या ऊत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  रवीवारी सकाळी १० वाजता श्री साईबाबांची महापुजा, दुपारी १२ वाजता श्री साईबाबांची आरती, दुपारी १ ते…

Read More

कोल्हापूर येथील विभागीय युवक महोत्सवात माजगाव येथील कुणाल वारंग व विक्रम कासार यांचे यश

⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: कोल्हापूर येथे पार पडलेल्या विभागीय युवक महोत्सवात ,माजगाव येथील कुमार कुणाल वारंग याने सुगम गायन तसेच हार्मोनियम एकल वादनमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर माजगाव कासारवाड मधील कुमार विक्रम कासार याने तबला सोलो वादनमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नाशिक येथे होणाऱ्या राजस्तरिय स्पर्धेत दोघांची निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक…

Read More

मारहाण प्रकरणी चारही संशयितांना सशर्त जामीन

सावंतवाडी ता.०८-:जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4 ही संशयित आरोपींना सावंतवाडी न्यायलयाने काल सायंकाळी उशिरा प्रत्येकी 15 हजार रुपयाचा जामीन अटी व शर्ती घालून मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड राहुल मडगांवकर, अँड धीरज सावंत, अँड रत्नाकर गवस यांनी काम पाहिले आहे.

Read More

मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी बजावल्या नोटिसा ⚡सावंतवाडी ता.०८-: पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांचा मनसे पदाधिकाऱ्यांनी डी वाय एस पी कार्यालय समोर निदर्शन करत निषेध व्यक्त केला होता. या पदाधिकाऱ्यांना आज मनाई आदेशाचा भंग करून जमाव निर्माण केल्याप्रकरणी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, माजी तालुकाध्यक्ष राजू कासकर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Read More

कुत्र्याच्या तावडीतून दोन वर्षीय सांबराला जीवदान

वनविभागाने सोडवून घेत सोडले नैसर्गिक अधिवासात ⚡आंबोली,ता.०८ अनिल चव्हाण-: कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले २ वर्षाचे सांबर वनविभागाने तावडीतून सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले.यावेळी.वनरक्षक अमोल पटेकर,पी.डी गाडेकर,बाळा गावडे,मंगेश नाटलेकर यांनी त्यावर उपचार करून जंगलात नेवून सोडले.

Read More

आ नाईक यांच्या कारवाईचा निषेध

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर;सुडाची कारवाई असल्याचा केला आरोप ⚡सावंतवाडी ता.०८-: आमदार वैभव नाईक यांच्यावरील कारवाई हे राजकीय सुडाचं षडयंत्र आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटल आहे. प्रचंड महागाईने जनता त्रस्त झाली असताना जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार घडत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे याबाबत…

Read More

एसीबी अधिकाऱ्यांकडून आम. वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी

कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर नाईक यांची केली एक तास चौकशी कणकवली 7 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा कणकवलीत दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी आमदार नाईक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर श्री नाईक दाखल झाले. या ठिकाणी श्री. नाईक यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आल्याचे समजते….

Read More

आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡कणकवली ता.०७-: आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 116 जणांनी रक्ततपासणी, बी.पी.तपासणी करुन घेतली. 12 जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन तळेरे येथील प्रतिथयश डॉ. मिलिंद कुलकर्णी, डाॅ.प्रकाश बावधनकर,प्रा.आरोग्य केंद्राच्या डॉ. सौ.इंगवले,माजी पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, अशोक तळेकर, उदय तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष…

Read More

एल एल बी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करा

स्टुडंट्स असोसिएशनची समाज कल्याण विभागाकडे मागणी मालवण, दि प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचे हप्ते खात्यात लवकरात लवकर बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन ( मालसा ) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुरडकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागातील शिष्यवृत्ती विभागाचे सुनिल बागुल…

Read More
You cannot copy content of this page