बांदा येथे ९ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.०८-: रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही काणेकर कुटुंबियातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री साईबाबांचा ऊत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवला ६९ वर्षे पूर्ण होत आहे. या ऊत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  रवीवारी सकाळी १० वाजता श्री साईबाबांची महापुजा, दुपारी १२ वाजता श्री साईबाबांची आरती, दुपारी १ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद, संध्याकाळी ४ वाजल्यापासुन तिर्थप्रसाद होणार आहे.
रात्री ठीक ९ वाजता पहिल्या सत्रात गोव्यातील नामवंत भजनी कलाकार पांडुरंग राऊळ. विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गवस आणि त्यांचे सहकलाकार यांचा पारंपारीक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात रात्री ठीक ११ वाजता जेष्ठ संगीतकार, रचनाकार व गायक स्व.पं.जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे सत्शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांचा शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत पं. श्री तुळशीदास नावेलकर (गोवा) व संवादिनी श्री राया कोरगांवकर (गोवा) हे करतील.
त्यानंतर तिसऱ्या सत्रात डॉ श्री राम देशपांडे यांचे शिष्य श्री नहुष लोटलीकर (गोवा) यांचा शास्त्रीय/उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत श्री सुनाद राया तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोरगांवकर (हार्मोनियम), बुद्देश तळकर (तबला) हे करतील. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन काणेकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page