⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: कोल्हापूर येथे पार पडलेल्या विभागीय युवक महोत्सवात ,माजगाव येथील कुमार कुणाल वारंग याने सुगम गायन तसेच हार्मोनियम एकल वादनमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर माजगाव कासारवाड मधील कुमार विक्रम कासार याने तबला सोलो वादनमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नाशिक येथे होणाऱ्या राजस्तरिय स्पर्धेत दोघांची निवड झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्र विभागीय केंद्र, कोल्हापूर आयोजित यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवक महोत्सव-२०२२ चे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या महोत्सवात त्यांनी हे यश संपादन केले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
