माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर;सुडाची कारवाई असल्याचा केला आरोप
⚡सावंतवाडी ता.०८-: आमदार वैभव नाईक यांच्यावरील कारवाई हे राजकीय सुडाचं षडयंत्र आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटल आहे. प्रचंड महागाईने जनता त्रस्त झाली असताना जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार घडत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आमदार वैभव नाईक आपण खंबीर उभे रहा. वेळ प्रत्येकाची येत असते या सुडाच्या राजकारणात आम्ही आपल्या सोबत आहोत. जनता महागाईने होरपळत असताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास सरकारला रस राहिला नाही देशामध्ये अघोषित आणीबाणी लावून केंद्र सरकारने राज्य सरकार जननियुक्त लोकप्रतिनिना त्रास देत आहेत आम्ही त्याचा निषेध करतो असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
