Headlines

बी एस एन एल ला जनरेटर बसवावा

डींगणे ग्रुप ग्रामपंचायतीची जिल्हा प्रबंधक यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीडिंगणे गावात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर येथील बिएसएनलचा मोबाईल मानोरा तात्काळ बंद पडतो. यामुळे ऑनलाईन प्रशासकीय कामे खोळंबत असल्याने याठिकाणी जनरेटर बसवावा अशी लेखी मागणी डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने दुरसंचारचे जिल्हा प्रबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, डिंगणे गावातील विद्युत पुरवठा हा जंगल भागातून असल्याने विद्युत…

Read More

डेगवेत कोकम, फणस प्रक्रिया युनिटचे उद्घाटन

⚡बांदा ता.१३-: बांदा मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रातील डेगवे गावात नारायण शिवराम गावडे यांच्या कोकम, फणस प्रक्रिया युनिटचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर युनिट साठी बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून अर्थसहाय्य करण्यात आले असून कृषि विभागाकडून सदर प्रकल्प सादर करण्यात आला होता.उद्घाटन प्रसंगी कोकणामध्ये फळप्रक्रीया…

Read More

एनबीए पुनर्मूल्यांकनात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेच्या या तीनही विभागांना वर्ष 2019 मध्ये पहिल्यांदाच एनबीए मानांकन प्राप्त झाले होते. अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच स्थापनेपासून केवळ पाच वर्षांच्या कालावधीत सदरचे मानांकन मिळवण्याचा बहुमान संस्थेने प्राप्त केला होता….

Read More

क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी यांची बैठक बोलवा

क्रीडा समन्वय समितीचे क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १३सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले आणि उत्कृष्ट असे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्ह्यात ५ राज्यस्तरीय व २० विभागस्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.त्यासाठी सर्व क्रीड़ा संघटना, क्रीड़ाप्रेमी, खेळाडू, यांची संयुक्त सभा घेऊन राज्याच्या क्रीड़ा धोरणानुसार नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीने जिल्हा…

Read More

मळेवाड येथे भर वस्तीत गव्यांचा धुमाकूळ

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण;लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ -: मळेवाड जकात नाका येथील व्यापाऱ्यांच्या मागील बागायतीत आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान दोन गव्यांचा मुक्त वावर सुरु होता. ग्रामस्थांची चाहूल लागताच लगतच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोखंडी गेट उडवून सरळ जंगलात धूम ठोकली. येथील ग्रामस्थांनी तसेच गोव्याला कामाला जाणाऱ्या व्यक्तींनी हे दृश्य…

Read More

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या भात नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या” शिष्टमंडळाची कणकवली तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.१३-: सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होत आहे. उभ्या भात पिकाच्या लोंब्याला (केसर) कोंब आलेले आहेत. तरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या भातशेतीचे तात्काळ पाहणी करून पंचयादी घालून लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात यावी अशी मागणी कणकवलीचे नायब तहसीलदार शिवाजी राठोड व तालुका कृषी…

Read More

नांदगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रश्नमंजुषा

⚡कणकवली ता.१३-: आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी नांदगाव* यांच्या तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्दू शाळा मधील विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आयेशा सिद्दीक शागीर बागवान व हदिया नाहीद बडेघर,द्वितीय क्रमांक सना करीम शाह पटेल व तमन्ना दाऊद शहा पटेल,तृतीय…

Read More

डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुतर तर ज्ञानेश्वर गिरी यांना महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगावच्या वतीने होणार सन्मान ⚡कणकवली ता.१३-: नांदगाव आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुत पुरस्कार तर बिड येथील ज्ञानेश्वर गिरी यांना “महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जाहीर करण्यात आला असल्याचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव या संस्थेच्या माध्यमातून…

Read More

जिल्हा परिषदेच्यावतीने १५ रोजी साजरा होणार हात धुवा दिन

सिंधुदुर्गनगरी ता १३१५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी सिंधुदूर्ग जिल्हयांत सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यांत येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरुन अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, स्वयंपाक झाल्यावर शौच विधीहून आल्यानंतर बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापूर्वी जेवणानंतर इत्यादी बाबीसंदर्भात…

Read More

विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटना करणार समन्वय समिती स्थापना

१५ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे बैठकसर्व संघटना प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन ⚡ओरोस ता १३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत संघटित आवाज उठविण्यासाठी जिल्ह्यात सर्व विभागांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात…

Read More
You cannot copy content of this page