डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुतर तर ज्ञानेश्वर गिरी यांना महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगावच्या वतीने होणार सन्मान

⚡कणकवली ता.१३-: नांदगाव आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुत पुरस्कार तर बिड येथील ज्ञानेश्वर गिरी यांना “महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जाहीर करण्यात आला असल्याचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.
किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी पासून आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येणार असून 2022 पुरस्कार साठी वरील दोन नावे जाहीर करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील मौजे माळेगांव येथील भुमिपुत्र तथा सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक , आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे , बीड युवक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी भगवंत आप्पा वायबसे यांचे निकटवर्तीय व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा प्रवक्ते तथा युवा नेतृत्व,तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाज वादक,व अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर (माऊली) दशरथ गिरी यांना या वर्षीचा मानाचा आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेला “महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार 2022” हा पुरस्कार किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव ता.कणकवली . जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने जाहीर करण्यात आला असल्याचे अध्यक्ष ऋषीकेश मोरजकर यांनी जाहीर केले आहे. आजपर्यंत समाजातील कष्टकरी शेतकरी बांधवांना आरोग्य सेवा देण्यासाठी ज्यांनी अनेक आरोग्य शिबीरे आयोजित करुन जनसेवा जोपासण्यासाठी मेहनत घेतली या कार्याची विशेष दखल झाल्याने मित्र परिवार यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच दुसरे पुरस्कार विजेते बिड येथील भुमिपुत्र तथा सामाजिक , शैक्षणिक , आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या डॉ दत्ता तपसे यांना या वर्षीचा मानाचा आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेला “महाराष्ट्र आरोग्यदुत पुरस्कार 2022” हा जाहीर करण्यात आला .

You cannot copy content of this page