⚡कणकवली ता.१३-: आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी नांदगाव* यांच्या तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्दू शाळा मधील विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आयेशा सिद्दीक शागीर बागवान व हदिया नाहीद बडेघर,द्वितीय क्रमांक सना करीम शाह पटेल व तमन्ना दाऊद शहा पटेल,तृतीय क्रमांक हुसेन जाक्रीया शेख व फिरदोस अब्दुल्ला शेख. स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
इरफान साठविलकर मज्जित बटवाले असिफ बटवाले कमलाकर महाडिक दिलावर साठविलकर शाहिद बटवाले सईद बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
