ग्रामस्थांत भीतीचे वातावरण;लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ -: मळेवाड जकात नाका येथील व्यापाऱ्यांच्या मागील बागायतीत आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान दोन गव्यांचा मुक्त वावर सुरु होता. ग्रामस्थांची चाहूल लागताच लगतच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोखंडी गेट उडवून सरळ जंगलात धूम ठोकली. येथील ग्रामस्थांनी तसेच गोव्याला कामाला जाणाऱ्या व्यक्तींनी हे दृश्य पाहिल.
आधीच मळेवाड गावातील शेतकरी या गव्यांमुळे चिंतेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे या गव्यांच्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातच या गव्यांनी आपला मोर्चा भरवस्तीत वळविल्याने येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच आता भात पिकल्याने भात कापणीवेळीही या गव्यांचा असाच धुमाकूळ राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. वनकर्मचाऱ्यांनी याची दखल घेत याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
