Headlines

भरड येथील सती मंदिराचा कलशारोहण व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

⚡मालवण ता.१८-: मालवण भरड येथील सती देवी घुमटीची भरड सन्मित्र रिक्ष चालक मालक संघ व भरड मित्रमंडळ यांच्यावतीने पुनर्बांधणी करताना जीर्णोद्धार करून मंदिराची उभारणी करण्यात आली असून त्याचा मूर्ती पुन: प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शनाचा व तीर्थ प्रसादाचा लाभ…

Read More

जिल्ह्यात उस क्षेत्रात वाढीचे श्रेय डि. वाय. पाटील साखर कारखान्याला

मनिष दळवी;डॉ.डि वाय. पाटील साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ ⚡कणकवली ता.१८-: जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी वाटचालीमध्ये आम्ही आपले सहकारी म्हणून तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहोत. आमची जिल्हा बँक निश्चितपणे डि वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर राहील. जिल्ह्यामध्ये उसाचे उत्पन्न हे नगन्य…

Read More

वेंगुर्ल्यात ३१ ऑक्टोबर चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.१८-: ३१ ऑक्टोबर हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या विद्यमाने वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिकच्या सभागृहामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

गोवा रेडक्रॉसतर्फे सेवाभावी संस्थांना वैद्यकीय साहित्य प्रदान

⚡वेंगुर्ला ता.१८-: गोवा रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेसाठी दोन कॉन्सेट्रेटर आणि रोटरी ट्रस्ट सावंतवाडीला दोन कॉन्सेट्रेटर व दोन व्हीलचेअर मोफत प्रदान करण्यात आले.

Read More

तरुण पिढीने धम्म जाणून घेणे आवश्यक – प्रा.नंदगिरीकर

⚡वेंगुर्ला ता.१८-: आजच्या तरुण पिढीने मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून धम्माबाबत ज्ञान घेणे आवश्यक आहे. धम्म म्हणजे काय हे जाणून घ्या, वाचन करा असे आवाहन करताना बौद्ध धम्माबाबतची आजची स्थिती यावर प्रा. नंदगिरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Read More

शेर्ले-निगुडे-सोनुर्ली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 रोजी जन आंदोलन

निगुडे सरपंच समीर गावडे यांनी दिले सावंतवाडी उपविभाग महसूल अधिकाऱ्यांना निवेदन ⚡बांदा ता.१८-: निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी उपविभाग अधिकारी (महसूल) सावंतवाडी यांना दि २० ऑक्टोबर २०२२ रोजी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी पत्रात असे म्हटले की शेरले- निगुडे -सोनुर्ली या मुख्य रस्त्यावरून गेले कित्येक दिवस ओव्हरलोड खनिज वाहतूक होत आहे त्यामुळे शेरले-…

Read More

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ प्रमुख व्यापारी पदाधिकाऱ्यांची उद्या कुडाळ येथे बैठक

⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्ताव तालुका आणि ग्रामीण व्यापारी संघांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाकडे देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावावर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२ बाजारपेठांतील प्रमुख व्यापारी पदाधिकारी व व्यापारी बांधवांची तातडीची विशेष व्यापक बैठक बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी…

Read More

सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करा

हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्या;जिल्हा काँग्रेसचे राज्य शासनासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन ओरोस ता.१८-: परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी. त्याच बरोबर मजुरांना विशेष अनुदान द्यावे, अशा प्रकारची राज्य शासनाकडे मागणी करणारे निवेदन जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस…

Read More

कोंकणी परिषद समिती सदस्यपदी रुजरिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा निवड

⚡मालवण ता.१८-: अखिल भारतीय कोंकणी परिषद च्या नवीन कार्यकारी समितीवर गोवा, कर्नाटक,केरळ,आणि महाराष्ट्रच्या सदस्यांनी तिसऱ्यांदा ज्यास्त मतांनी २०२२- २४ या कालावधीसाठी रुजारिओ पिंटो (मालवण) यांची सदस्यपदी एकमुखी निवड केली. पिंटो यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक साधली. अखिल भारतीय कोंकणी परिषदेची निवडण्यात आलेली कार्यकरणी पुढीलप्रमाणे:- अध्यक्ष – अरूण उभयकार( कुमठा), उपाध्यक्ष – मेल्विन रोड्रिगीस(मंगळूर),…

Read More

प्लास्टिक विकणाऱ्या व्यवसायिकांसह विक्रेत्यांवर कारवाई

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडीत प्लास्टिक विकणाऱ्या व्यवसायिकांसह विक्रेत्यांना आज नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाकडून दणका देण्यात आली असून, आज अचानक राबवण्यात आलेल्या मोहिमेमधून कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई प्लास्टिक बंदी पथक आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरीचे अमित लाटे, आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, परवीन शेख,…

Read More
You cannot copy content of this page