वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत कडून
15 वा वित्त आयोग अंतर्गत
गावातील गरजू महिलांना ग्रामपंचायत कडून मोफत घरघंटी देण्यात आली.यावेळी
गावातील 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच घरदुरुस्तीसाठी मदत म्हणून संबंधिताना धनादेश देण्यात आला. जि.प. शाळेत आपली मुले दाखल करण्याचे आवाहन ग्रामपंचायत कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मराठी शाळेत आपली मुले दाखल करणाऱ्या पालकांची घरपट्टी लोकप्रतिनिधी कडून भरून त्याची पावती पालकांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त आशा स्वयंसेविका स्नेहल तिवरेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कडून कौशल्य विकास अंतर्गत गावातील महिलांना पारंपरिक फुगडी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी रेडी ग्रा. पं. सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच आनंद भिसे, माजी सरपंच अनंत कांबळी, माजी उपसरपंच नमिता नागोळकर,
ग्रा.पं. सदस्य विनोद राणे, गणेश भगत, सागर रेडकर, रश्मी रेडकर, प्रज्ञा राऊळ, रिचा सावंत, मानसी राणे शमिका नाईक, तसेच ग्रामस्थ शाम गवंडी, मुकुंद गवंडी, नूतन मांजरेकर, शेखर वारखंडकर, शिवाजी सावंत, सावळाराम राणे,
अल्प संख्याकचे रफि्क बेग, महिला,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. रेडी ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
रेडी ग्रामपंचायत राबवतेय विविध सामाजिक उपक्रम….
