आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन…
⚡मालवण ता.२६-: हडी येथील कट्टर राणे समर्थक राजेश उर्फ (बंबू) शेडगे यांच्यासह भावेश सुर्वे, रवींद्र सुर्वे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला.
आमदार वैभव नाईक यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन त्याचबरोबर हडी गावाचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे राजेश शेडगे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख राजेश गावकर, हडी गावचे माजी उपसरपंच, शाखा प्रमुख संतोष अमरे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिंदरकर, दशरथ गावकर, नंदकुमार गावकर, नागेश कावले, सिद्धेश मांजरेकर, हरी आसोलकर आदी उपस्थित होते.
