⚡सावंतवाडी ता.२६-: येथील मोती तलावाच्या काठावर बसलेली अज्ञात व्यक्ती पात्रात कोसळल्याची घटना आज सायंकाळी साडेसात वाजता च्या सुमारास घडली . संबंधित तरुण हा स्लाइडिंग कामगार असल्याचे कळते. घटनास्थळी त्याला वाचवण्यासाठी गर्दी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधाशोध सुरू आहे.त्याचे नाव व ठिकाण समजू शकलेले नाही. काळोख झाल्याने शोधमोहीमेला अडथळा येत आहे.
सावंतवाडी मोती तलावाच्या पात्रात कामगार कोसळला
