इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

⚡मालवण ता.२६-: इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशिकांत पराडकर यांच्या हस्ते झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिसच्या खेळाडूंना संधी मिळावी आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवण मध्ये दरवर्षी आयोजित केली जाते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी निशिकांत पराडकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचं नाव टेबल टेनिस खेळामध्ये उज्वल करावे, असे सांगितलं.

या उद्घाटन समारंभाप्रसंगी सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी दिलीप हुनारी, सेवानिवृत्त आयटी ऑफिसर शशांक घुर्ये, प्रदीप डिचोलकर तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, रवींद्र तळाशिलकर, शुभम मुळीक, अजय जोशी, पंकज पेडणेकरसौ. प्रांजल जाधव, सौ. मेघना वारंग, समीर म्हाडगूत तसेच स्पर्धक, पालक व टेबल टेनिसचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किरण पिंगुळकर यांनी केले.

You cannot copy content of this page