दक्ष युवक भारत संघटनेतर्फे मालवणात संविधान दिन साजरा

⚡मालवण ता.२६-: दक्ष युवक भारत संघटनेमार्फत मालवण एसटी स्टँड परिसर येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याबरोबरच संविधान विषयी मार्गदर्शन व जागृती करण्यात आली.

संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दक्ष युवक भारत संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात राबवले जाणार आहेत. भारताचे संविधान विषयी व मुलभूत हक्क आणि कर्तव्य याबाबत जनजागृती करणे हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अंतर्गत आज मालवणात संविधान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी भाग्यश्री लाकडे व वैभव वळंजू यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. तर ऍड. उर्मिला आचरेकर यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन करताना मूलभूत हक्क व अधिकार याविषयी माहिती देताना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान वाचले पाहिजे, असे सांगितले. ओंकार केणी यांनी पर्यावरण संवर्धन विषयक विषयावर संविधानाच्या आधारे न्यायालयात दाद मागू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. मंदार ओरसकर यांनी संविधानाबाबत शाळाशाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे, असे सांगितले. तर चारुशीला देऊलकर यांनी सर्व स्तरातील, सर्व धर्म जातीतील लोकांनी मिळून संविधान साजरा केला पाहिजे असे सांगितले. संघटनेच्या अध्यक्ष मिली मिश्रा यांनी संघटनेमार्फत विविध कार्यक्रम राबवून नागरिकांना संविधानाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी बाजीराव काळे, महादेव तळवडेकर, तनिषा मालवणकर यांनीही विचार मांडले. तर वैभव वळंजू यांनी संविधानावर पोवाडा सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेगल डीसोजा हिने केले. यावेळी स्वाती पारकर, मीना घुर्ये, मनीषा पारकर, राहुल जाधव, जेम्स फर्नांडिस, नितेश जाधव, ऐश्वर्य मांजरेकर, अक्षय रेवंडकर, दर्शन वेंगुर्लेकर, तनिषा मालवणकर, रोहिणी चव्हाण, हार्दिक कदम, दीप्ती फाटक, गणेश पाडगावकर, सरदार ताजर यासंह इतर नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page