उपस्थितीत राहण्याचे अण्णा केसरकर यांचे आवाहन ..
⚡सावंतवाडी ता.२६-: कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा करून सीमाभागातील मराठी बांधवांची चेष्टा सुरू केली आहे. या वक्तव्याबद्दल निषेध आणि विरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी २८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिमखाना येथील हाँटेल दळवी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत मराठी सीमावर्ती बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकिकरण समिती जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले आहे.
