Headlines

रक्तदान शिबिराचे आयोजन…

संतोष बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑगस्टला वैभववाडीत रक्तदान शिबिर..

वैभववाडी प्रतिनिधी
युवा नेते, सामाजिक कार्याची जाण असलेले आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे मा.श्री.संतोष धोंडू बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त जय मल्हार दुर्गोबा मंडळ, आचिर्णे, धाकू बयाजी गोरे ट्रस्ट व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे केवळ दान नसून, गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे आणि “रक्तदान हेच खरे जीवनदान” हा संदेश समाजात रुजवावा.
दिनांक : ३० ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
स्थळ : ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी आयोजित करण्यात आले आहे तरी रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page