पाडलोसमध्ये पूल कोसळून डंपरचा अपघात
सुदैवाने चालक बचावला : डंपरचे मोठे नुकसान ⚡बांदा ता.०१-: पाडलोस-माडाचेगावळ मोरीपुलाचा अर्धा भाग अचानक खचल्याने सुमारे दहा फूट उंचीवरून चिरे वाहतुक करणारा डंपर कोसळून अपघात झाला. पुलाचा भाग खचत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. तीस वर्षांपूर्वी केलेले बांधकाम कमकुवत झाले असून पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे….
