महविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
शुभेच्छांचा सुरू आहे वर्षाव
⚡सावंतवाडी ता.०१-: येथील राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे परब यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयाकडे छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना जिल्ह्यातील महाविकास आघाडी पक्षांतून तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, रोहन परब, इफतिकार राजगुरू, संतोष जोईल, याकुब शेख बस्तीव फर्नांडिस ,अफरोज राजगुरू, चित्रा देसाई, रिद्धी परब, पुनम वंजारी, अँड.सायली दुभाषी , मंजिरी परब, सुनील उपरकर मारीता फर्नांडिस, आदी उपस्थित होते.
