⚡मालवण ता.०१-: सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री. ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये मानवी साखळी द्वारे एनसीसी फ्लॅग तयार करण्यात आला, तसेच एनसीसीचा केक तयार करण्यात आला.
प्राचार्य ठाकूर यांनी देश संरक्षणासाठी असणारे एनसीसीचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त करताना देशाची संरक्षण व्यवस्था आणि त्यामध्ये असणाऱ्या एनसीसी मधील सहभागाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत, एनसीसी सीनियर्स प्रीती बांदल तेजस पोळ, नारायण मुंबरकर ,पूर्वा कोयंडे , तृप्ती माडिये, मिथील मोरवेकर, बिरू खरात, अक्षता आचरेकर, मॅक्झिना ,अर्जुन मालवणकर ,गोपाळ कावले यांनी केले. यावेळी कॉलेजचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दीपक दयाल यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
