बांद्यात पदवीधर तरुण अपक्ष निवडणूक लढविणार

प्रशांत गवंडी प्रभाग दोन मधून रिंगणात : मतदारांना अपेक्षित काम करणार

⚡बांदा ता.०१-: बांदा शहर हे केवळ नावापुरते शहर नको तर त्याला शहराचे रूप आले पाहिजे. चार दुकाने वाढली किंवा चांगली झाली म्हणजे शहर नव्हे तर त्याच्यासोबत सोयीसुविधाही असणे आवश्यक आहे. गुवाहटीला जाण्यासारखे राजकारण न करता बांद्यातील समस्या मार्गी लावण्याचे काम करणार असल्याने प्रभाग दोन मधून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया प्रशांत पांडुरंग गवंडी यांनी सांगितले.

बांद्यातील मुख्य समस्या कचऱ्याची आहे. कचरा गाड्यांजवळ कचरा न राहता स्वच्छता असणे गरजेचे आहे. पार्किंग समस्या तर ग्रामस्थांसमोर उभी आहे. राजकीय वातावरणाचा अभ्यास करून आपण निवडणूक लढत असून आतापर्यंतच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देत नवीन दिशा द्यायचे आहे. बांदा बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत असून प्राथमिक सोयीसुविधा मुबलक मिळणे आवश्यक असल्याचे पदवीधर अपक्ष उमेदवार प्रशांत गवंडी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत जर निवडून नाही आलो तरी देखील माझ्या वचननाम्यातील प्रत्येक काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सद्यस्थितीत विचित्र राजकारण सुरू आहे. त्यामुळे निवडणून आलो तर गुवाहटीला जाण्यासारखे राजकारण न करता गावातील ग्रामस्थांना व मतदारांना अभिप्रेत काम करणार असल्याचे अपक्ष उमेदवार प्रशांत गवंडी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page