जलतरणसाठी वाढविलेले शुल्क रद्द करा

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी

⚡सावंतवाडी ता ०१-: येथील सुरू करण्यात आलेल जलतरण तलावाचे शुल्क वाढवल्यामुळे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज प्रांताधिकारी यांची भेट घेऊन शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले. दरम्यान, पूर्वीप्रमाणे असलेले २० रुपये शुल्क आकारण्यात यावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील सवलत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव माजी नगरसेवक उमेश कोरगावकर माजी नगरसेवक उमाकांत वारंग माजी नगरसेविका अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page