Headlines

माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांचा ठाकरे गटाला “जय महाराष्ट्र”

उपतालुका प्रमुख म्हणून होते कार्यरत;आ वैभव नाईक यांच्या अन्यायामुळे निर्णय घेतल्याचा केला आरोप मालवण दि प्रतिनिधीशिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख तथा मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मोरजकर हे खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र अलीकडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सातत्याने खासदार समर्थकांवर अन्याय केला…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांची पोईप गावाला भेट

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद ⚡मालवण ता.१२-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर पोईप गावाला भेट देत जि प माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या सोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप पुरस्कृतसरपंच पदाचे उमेदवार श्रीधर राघोजी नाईक, सदस्य पदाचे उमेदवार प्रभाग १ आशिर्वाद बाबू माधव, मनाली महेंद्रनाथ नाईक,…

Read More

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

देवगड बौध्दजन सेवा संघाने व्यक्त केली नाराजी देवगड (प्रतिनिधी)राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते याचा निषेध सोमवारी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ-तळेबाजार यासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून करण्यात आले. देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष…

Read More

जलतरण व कॅरम स्पर्धेत देवबाग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश

⚡मालवण ता.१२-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत तसेच तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत देवबाग येथील डॉ. दत्ता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत लहान गट (१४ वर्षे)- वैयक्तिक – जितेश उत्तम केळुसकर – प्रथम क्रमांक (५० मी. बॅक स्ट्रोक), केशव गणेश साळगावकर –…

Read More

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कळसुलकरचा संघ विजयी

कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड ⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ- : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत माणगाव हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या (१७ वर्ष वयोगट मुली) जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये येथील कळसुलकर हायस्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय फुटबॉल खेळातून अंतिम सामना साळगाव हायस्कूल या संघाबरोबर झाले असता या सामन्यांमध्ये कळसुलकर…

Read More

वैश्यवाडा येथील नागरिकांची नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह नगरपालिकेत धडक

सतत उद्भवत असलेल्या पाणी समस्येपोटी अधिकाऱ्यांना घेराव ⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील वैश्यवाडा येथील नागरिकांनी येथे सतत उद्भवत असलेल्या पाणी समस्येपोटी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह नगरपालिकेत धडक दिली. नगरपालिकेतील मुख्य लिपिक आसावरी शिरोडकर आणि वॉटर सप्लायचे अधिकारी यांना घेराव घालून पाणी नियमित करण्याची मागणी केली व आठ दिवसाची मुदत दिली. सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथे गेल्या…

Read More

शरद पवार यांचा वाढदिवस मळेवाड येथे साजरा

राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१२-: माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आज मळेवाड येथे साजरा करण्यात आला. युवा परिवर्तन, अर्चना घारे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित दोन दिवशीय केक बनवणे व चॉकलेट बनवणे या शिबिरात सहभागी महिलांनी बनवलेला केक राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

डॉ अर्चना सावंत यांना वाढता पाठिंबा

माजगावात परिवर्तन अटळ: कार्यकर्त्यांच्या भावना ⚡सावंतवाडी ता.१२-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. या ठिकाणी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढत आहेत. सरपंच पदाचे उमेदवार डाॅ.सौ. अर्चना सावंत यांना मतदाराचा वाढता कल मिळत आहे. घरोघरी प्रचारावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून सरपंच पदाच्या सौ. अर्चना सावंत या उमेदवाराकडे पाहिले जात आहे….

Read More

बांदा येथे अवकाळी पावसाची एक तास झोडपले

आठवडा बाजारावर झाला परिणाम ⚡बांदा ता.१२-: आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल एक तास पाऊस कोसळल्याने सोमवार आठवडा बाजारातील व्यापारी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.आज सायंकाळी ४ वाजता पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक तास पाऊस कोसळला. आज बांदा शहराचा आठवडा बाजार असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरात…

Read More

राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेस विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ग्रीन व व्हाईट असे दोन टु इन वन बोर्ड प्रदान

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ⚡वेंगुर्ले ता.१२-: राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीतर्फे राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेले, खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नवीन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट…

Read More
You cannot copy content of this page