Headlines

दांडेलीत निकृष्ट दर्जेदार काम ग्रामस्थांनी रोखले

अधिकारी धारेवर; रस्त्याची दिली तीन वर्षांची हमी : साईडपट्टीचेही बांधकाम होणार ⚡बांदा ता.१३-: दांडेलीत सुरू असलेले रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी रोखले. जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला. अधिकारी दाखल होताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांच्या रोषाला मात्र त्यांना सामोरे जावे लागले. रस्त्याची…

Read More

जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला लसीकरण

पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर कालावधीत सिंधुदुर्गनगरी ता १२सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २५ डिसेंबर आणि १५ जानेवारी ते२५ जानेवारी २०२३ या दोन टप्प्यात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये डोस पासून वंचित राहिलेल्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी आज दिली. सिंधुदुर्ग…

Read More

मुलांना पुस्तक हातात घ्यायला लावणारे बाल-कुमार संमेलनासारखे साहित्यिक उपक्रम अधिक प्रमाणात व्हावेत

डॉ. राजेंद्र चव्हाण;कसालच्या ‘घुंगुरकाठी बाल-कुमार साहित्य संमेलना’त व्यक्त केली अपेक्षा ⚡ओरोस ता.१३-: विशिष्ट उद्दिष्ट ठेऊन आयोजित सूत्रबद्ध रितीने आयोजित केलेल्या या बाल-कुमार साहित्य संमेलनासारखे उपक्रम क्वचितच होतात. मुलांना गोष्टीचे पुस्तक हातात घ्यायला लावणारे असे उपक्रम अधिक प्रमाणात झाले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक व कल्पक दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी काल येथे व्यक्त केली. ‘घुंगुरकाठी,…

Read More

परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात अज्ञाताने केला वार

कामगार जखमी:अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल बांदा/प्रतिनिधीजीवन प्राधिकरण विभागाच्या पाण्याच्या जलवाहिनीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या डोक्यावर अज्ञाताने वार केल्याने कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल रात्री घडली. याची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.याबाबत सविस्तर…

Read More

आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी स्वप्निल कल्याणकर तर सचिवपदी आदित्य महाडिक

⚡कणकवली ता.१३-: आदर्श व्यापारी संघटना तळेरेची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत अध्यक्ष म्हणून स्वप्निल कल्याणकर तर सचिव म्हणून आदित्य महाडिक यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. आदर्श व्यापारी संघटना तळेरेची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-अध्यक्ष- स्वप्नील गणेश कल्याणकर, सेक्रेटरी- आदित्य पंढरीनाथ महाडिक, सह सेक्रेटरी- कल्पेश देवानंद तळेकर,उपाध्यक्ष- नितेश राजेंद्र पिसे, विनोद विश्वनाथ धुरे,खजिनदार- राजेंद्र दादा पिसे,सह…

Read More

चराठे ग्राम पंचायत निवडणूक: आपण राष्ट्रवादी पॅनलची अधिकृत उमेदवार

उमेदवार गौरी गावडे यांनी केले स्पष्ट;विरोधी पॅनेलशी सबंध नसल्याचेही सांगितले सावंतवाडी ता.१३-: चराठे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन मारीता बावतीस फर्नांडिस यांना थेट सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी पुरस्कृत ‘श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनल’च्या प्रभाग क्र. १ चे उमेदवार सुनिल राजाराम परब, मंजिरी मिलींद उपरकर,प्रभाग क्र. ३ चे…

Read More

निबंध स्पर्धेत कुडाळचे विजय ठाकूर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत कुडाळ येथील विजय राघव ठाकूर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते. या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मालवण येथील नागेश रघुनाथ कदम तर तृतीय क्रमांक…

Read More

विविध रंगतदार कार्यक्रमांनी सजले साहित्य संमेलन

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुका येथील साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात किरातच्या संपादिका सीमा मराठे यांनी वि.वा.शिरवाडकर लिखित ‘वीज म्हणाली धरतीला‘ या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारून उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवली. याचे निवेदन निर्जरा पाटील हिने केले. त्यानंतर सांगलीहून आलेले कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात सिंधुदुर्गातील बारा कवींचा सहभाग होता. विठ्ठल कदम, सुधाकर ठाकूर, सरिता पवार,…

Read More

माजगाव ग्राम पंचायत प्रचारात संजू परब यांची उडी

भाजप – शिंदे गटाच्या परिवर्तन पॅनलला मिळाले बळ ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील प्रतिष्ठेची व सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात संजू परब यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी आज माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्या सोबत माजगाव ग्राम पंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. संजू परब यांच्या माजगावच्या प्रचारात येण्याणे माजगावात परिवर्तन होणार का..?…

Read More

गरजू व्यक्तींपर्यंत सेवा रूपाने पोहोचण्याचे काम करतेय सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान

लाखे वस्ती येथे पार पडले आरोग्य शिबीर ⚡सावंतवाडी ता.१३-: समाजाच्या गरजू घटकांपर्यंत सेवारूपाने पोहोचण्याचे कार्य सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून करीत आहे. शैक्षणिक, जनजागरण, रुग्णसेवा केंद्र याशिवाय आरोग्यविषयक उपक्रम प्रतिष्ठान नेहमीच राबवत असते. प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात नेहमी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असते. परंतु शहरातील गरजूंना देखील या सुविधांची तितकीच आवश्यकता…

Read More
You cannot copy content of this page