दांडेलीत निकृष्ट दर्जेदार काम ग्रामस्थांनी रोखले

अधिकारी धारेवर; रस्त्याची दिली तीन वर्षांची हमी : साईडपट्टीचेही बांधकाम होणार

⚡बांदा ता.१३-: दांडेलीत सुरू असलेले रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी रोखले. जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला. अधिकारी दाखल होताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांच्या रोषाला मात्र त्यांना सामोरे जावे लागले. रस्त्याची तीन वर्षे देखभाल व साईडपट्टी निर्धोक करून देणार असल्याची हमी दिल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले.
निकृष्ट दर्जाचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताना दांडेली सरपंच दादा पालयेकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, माजी सरपंच संजू पांगम, ग्रामपंचायत सदस्य निलेश आरोलकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोसकर तसेच ग्रामस्थ उत्तम मयेकर, राजन मालवणकर, दुर्गेश शेटकर, आबा माणगावकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page