⚡मालवण ता.१३-: कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची २०२१-२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. नूतन अध्यक्ष म्हणून अजयराज शरद वराडकर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त म्हणून कर्नल शिवानंद शरद वराडकर व अॅड. सोनू शंकर पवार यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून डॉ. विश्वनाथ वराडकर यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, संचालक सुधीर वराडकर, शिवराम गुराम, सुप्रिया वराडकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, महेश वाईरकर सल्लागार मंडळ- अॅड. ऋषी देसाई, सुहास वराडकर, व्हिक्टर डॉन्टस, संतोष साटविलकर, प्रभाकर वाईरकर, दीपक पेणकर यांची निवड करण्यात आली.
