उमेदवार गौरी गावडे यांनी केले स्पष्ट;
विरोधी पॅनेलशी सबंध नसल्याचेही सांगितले
सावंतवाडी ता.१३-:
चराठे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन मारीता बावतीस फर्नांडिस यांना थेट सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी पुरस्कृत ‘श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनल’च्या प्रभाग क्र. १ चे उमेदवार सुनिल राजाराम परब, मंजिरी मिलींद उपरकर,प्रभाग क्र. ३ चे उमेदवार मिलींद अंकुश उपरकर, गौरी सागर गावडे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३ च्या उमेदवार गौरी सागर गावडे राष्ट्रवादी पुरस्कृत श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅंनलची अधिकृत उमेदवार आहेत. परंतु, विरोधी पॅनलन आपल्या प्रचार पत्रकात त्यांच नाव छापल्याच निदर्शनास आले असून राष्ट्रवादी निवडणुक रिंगणात उतरल्यानं बसलेल्या धडकीमुळे हा खोडसाळ पणा केला आहे.
तर आपण राष्ट्रवादीच्या पॅंनलची उमेदवार असून त्या विरोधी पनलशी माझा कोणताही संबंध नसून श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅंनलची मी अधिकृत उमेदवार आहे अशी माहिती गौरी सागर गावडे यांनी दिली.
