⚡वेंगुर्ला ता.१३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत कुडाळ येथील विजय राघव ठाकूर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते.
या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मालवण येथील नागेश रघुनाथ कदम तर तृतीय क्रमांक संजय तांबे (फोंडाघाट) व मयूर संपत तायडे (जळगाव) यांना विभागून देण्यात आला. निबंध स्पर्धेचे परीक्षण शिरोडा हायस्कूलचे निवृत्त शिक्षक पी.एस.कौलापूरे यांनी केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये सांगलीचे प्रसिद्ध साहित्यिक व कवी आनंद हरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृंदा कांबळी, संजय घोगळे, संजय पाटील, प्रा. आनंद बांदेकर, रवी परब, प्रितम ओगले, महेश राऊळ उपस्थित होते.
फोटोओळी – प्रसिद्ध साहित्यीक व कवी आनंद हरी व वृंदा कांबळी यांच्या हस्ते विजय ठाकूर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.
