Headlines

सावंतवाडी शहर चौकी पुन्हा सुरू करा…

संजू शिरोडकर यांची मागणी:
उभा बाजार-चितार आळी येथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी..

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी काझी शहाबुद्दीन हॉल येथे सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानादरम्यान सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहर पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजीव शिरोडकर यांनी केली आहे.

सावंतवाडी शहरामध्ये पूर्वी कार्यरत असलेले पोलीस ठाणे काही वर्षांपूर्वी अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पोलीस सेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उभा बाजार-चितार आळी परिसरात शहर चौकी पुन्हा कार्यरत करावी, अशी मागणी माजी भाजपा सावंतवाडी शहराध्यक्ष अॅड. संजू शिरोडकर यांनी केली.

याबाबत सेवा अभियानाचे संयोजक आमदार प्रमोद जठार तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक साखरे यांच्याकडे अॅड. शिरोडकर यांनी निवेदन सादर केले. शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस चौकी सुरू झाल्यास नागरिकांना तातडीने पोलीस सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास हातभार लागेल, असे निवेदनातून नमूद करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला नगराध्यक्ष गिरीप, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडल अध्यक्ष सुधीर आरिवडेकर, सौ. मोहिनी मडगावकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page