भाजप – शिंदे गटाच्या परिवर्तन पॅनलला मिळाले बळ
⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील प्रतिष्ठेची व सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात संजू परब यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी आज माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्या सोबत माजगाव ग्राम पंचायत निवडणुकीचा आढावा घेतला.
संजू परब यांच्या माजगावच्या प्रचारात येण्याणे माजगावात परिवर्तन होणार का..? यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
माजगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व बाळासाहेबांचे शिवसेना कडून दोन्ही सावंत असे असलेले उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशी बनली आहे. त्यामुळे नेमकी माजगावकर हे भाजप बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने राहणार की महाविकास आघाडीला साथ देणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. त्यातच आता संजू परब यांनी या प्रचारात उडी घेतल्याने माजगावात परिवर्तन होणार का..? याकडे आता सर्वांचं लागलेय. निवडणुकी म्हटले की संजू परब यांनी नेहमी किंग मेकरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माजगावात परिवर्तन कडून ते किंगमेकर ची भूमिका बजावणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले.
