⚡मालवण ता.१२-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत तसेच तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत देवबाग येथील डॉ. दत्ता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत लहान गट (१४ वर्षे)- वैयक्तिक – जितेश उत्तम केळुसकर – प्रथम क्रमांक (५० मी. बॅक स्ट्रोक), केशव गणेश साळगावकर – द्वितीय क्रमांक (५० मी. बॅक स्ट्रोक). मोठा गट – (१७ वर्षे)- सांघिक – पार्थ जितेंद्र तारी, तेजस शाम कुमठेकर, तेजस पांडुरंग बांदेकर, गुंडू उत्तम राऊळ (४ × १००फ्री स्टाईल रिले प्रथम क्रमांक), वैयक्तिक – तेजस पांडुरंग बांदेकर – प्रथम क्रमांक (२०० मी. फ्री स्टाईल), गुंडू उत्तम राऊळ- प्रथम क्रमांक (५० मी. बॅक स्ट्रोक), प्रथम क्रमांक (२०० मी. फ्री स्टाईल).
तसेच तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या लहान गटात देवबाग हायस्कुलच्या अक्षया गजानन मांजरेकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. घेवडे, श्री. बांगारे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक जे. जे. पवार आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.
