कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ- : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत माणगाव हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या (१७ वर्ष वयोगट मुली) जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये येथील कळसुलकर हायस्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय फुटबॉल खेळातून अंतिम सामना साळगाव हायस्कूल या संघाबरोबर झाले असता या सामन्यांमध्ये कळसुलकर हायस्कूलच्या खेळाडू विद्यार्थिनींनी साळगाव हायस्कूलचा पेनल्टी शूट वर ३/२ असा पराभव करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. या खेळामध्ये वयोगट १७ खालील खेळाडू विद्यार्थिनी फुटबॉल कप्तान नेहा बागल, सह खेळाडू स्वरांगी मेस्त्री, सानवी पेडणेकर,आर्या भर्तू, खुशी परब,अनन्या गोरे, हस्तिका पेडणेकर, वैभवी बांदेलकर, कीर्ती गवस, सारा शेख, श्रेया घोडावडेकर, नम्रता गोंधळी, सानिया गवळी, आर्या सावंत, भार्गवी कदम, तन्वी कांबळे या विद्यार्थिनींचा संघात सहभाग आहे. या सर्व खेळाडू खेळाडू विद्यार्थिनीना प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री नारायण शंकर केसरकर तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री अरुण भिसे, श्री जितेंद्र मापसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यालयीन कामकाजासाठी प्रशालेचे शिक्षक श्री पी. बी. बागुल तसेच श्रीमती वर्षा बल्लाळ, गझल शेख यांची विशेष मदत लाभली. या सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठकर,
मुख्याध्यापक श्री एम. पी. मानकर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांचे कडून करण्यात असून विभागीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. क्रीडा तपस्वी कै.शिवाजीराव भिसे सरांनी घालून दिलेला क्रीडा स्पर्धेतील विजयाचा यशस्वी वारसा कळसुलकरच्या विद्यार्थ्यांनी पुढे चालविलेला आहे याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
