सतत उद्भवत असलेल्या पाणी समस्येपोटी अधिकाऱ्यांना घेराव
⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील वैश्यवाडा येथील नागरिकांनी येथे सतत उद्भवत असलेल्या पाणी समस्येपोटी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह नगरपालिकेत धडक दिली. नगरपालिकेतील मुख्य लिपिक आसावरी शिरोडकर आणि वॉटर सप्लायचे अधिकारी यांना घेराव घालून पाणी नियमित करण्याची मागणी केली व आठ दिवसाची मुदत दिली.
सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथे गेल्या एका महिन्यापासून पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. एक वेळ सुद्धा व्यवस्थित पाणी येत नसल्याने येथील नागरीक हैराण झाले होते. अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रार करून सुद्धा पाणी व्यवस्थित होत नसल्याने आज नागरिकांनी नगरसेवक भोगटे यांना घेऊन नगरपालिकेत धडक दिली. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी पाणी प्रश्नावर अनेक विषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासह दीपक गावडे, प्रशांत गोसावी, अश्विनी दळवी, रोहित गावडे, सुनील नार्वेकर, ज्योती मुद्राळे, व इतर त्या भागातील रहिवासी उपस्थित होते.
