शरद पवार यांचा वाढदिवस मळेवाड येथे साजरा

राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची प्रमुख उपस्थिती

⚡सावंतवाडी ता.१२-: माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आज मळेवाड येथे साजरा करण्यात आला. युवा परिवर्तन, अर्चना घारे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित दोन दिवशीय केक बनवणे व चॉकलेट बनवणे या शिबिरात सहभागी महिलांनी बनवलेला केक राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी शहर अध्यक्ष सायली दुभाषी तसेच सिद्धि परब चित्रा बाबर देसाई आधी पदाधिकारी उपस्थित होत्या.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना घारे परब फाउंडेशन युवा परिवर्तन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने मळेवाड फॉरेस्ट चौक येथे महिलांना केक बनवणे व चॉकलेट बनवणे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये स्थानिक महिलांनी सहभाग दर्शविला होता दोन दिवस झालेल्या या शिबिरात महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेला केक आज सौ अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत कापून शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनेकांनी सहकार्य परब यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page