माजी खासदार निलेश राणे यांची पोईप गावाला भेट

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद

⚡मालवण ता.१२-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर पोईप गावाला भेट देत जि प माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या सोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी भाजप पुरस्कृत
सरपंच पदाचे उमेदवार श्रीधर राघोजी नाईक, सदस्य पदाचे उमेदवार प्रभाग १ आशिर्वाद बाबू माधव, मनाली महेंद्रनाथ नाईक, सुभदा गोपाळ वर्दम, प्रभाग २ विष्णू रामचंद्र पालव, सहदेव शंकर वेगुंर्लेकर, संपदा अनिकेत सावंत, प्रभाग ३ महेश धर्माजी पालव, संचिता संतोष पालव, दिपाली अजय जाधव यासह भाजप कार्यकर्ते गाव अध्यक्ष शंकर रावजी पालव, पोईप गावचे भाजपचे उपसरपंच संदीप सावंत, परशुराम नाईक विलास माधव महेंद्र पालव अशोक पालव अनिकेत सावंत सुर्यकांत सावंत सुर्यकांत चव्हाण नंदू माधव मनोहर माधव मिलिंद नाईक अमेय नाईक बाबाजी नाईक संतोष पालव. अस्मित पालव, बाबू परब यासह अन्य उपस्थित होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले

You cannot copy content of this page