Headlines

वायरी बांध येथे उद्या ‘किमीश्चक व्रत’ दशावतारी नाटक

⚡मालवण ता.१४-: मकरसंक्रांतीच्या निमित्त हौशी कलाकार यांच्या वतीने दिनांक १५ जानेवारी रोजी रात्रौ दहा वाजता वायरी बांध येथील जुने दत्त मंदिर जवळ किमीश्चक व्रत हा दशावतारी पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या नाट्यप्रयोगाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हौशी कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

आनंद वाटत आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म

डॉ.दिलीप पटवर्धन ;जीवनविद्या मिशन कणकवली प्रबोधन महोत्सव उत्साहात ⚡कणकवली ता.१४-: जीवन जगणे हि एक कला आहे. इतर कला जशा तज्ञ व्यक्ति कडून शिकवून घेतल्याशिवाय आत्मसात करता येत नाही तशीच, सुखी समृद्ध, यशस्वी आनंदी जीवन जगण्यासाठी आपण खूप काही करतो परंतु जे करायला पाहिजे तेच करत नाही. ‘ते’ नेमके काय करायचे हे जे सांगतात त्यांनाच सद्गुरू…

Read More

रस्सीखेच स्पर्धेत होडावडा क्षेत्रपालेश्वर संघ विजेता

⚡वेंगुर्ला ता.१४-: जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा यांनी गरुडझेप महोत्सवांतर्गत शुक्रवारी आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत होडावडा क्षेत्रपालेश्वर संघाने विजेता तर सिद्धेश्वर डाळकर ‘अ‘ संघ उपविजेता ठरला.

Read More

हेल्मेट वापरा…अपघात टाळा..कणकवली रॅली…!
हेल्मेट जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡कणकवली ता.१४-: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने हेल्मेट तुमच्यासाठी, सुरक्षा कुटुंबासाठी असे सांगत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत कणकवली हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कणकवली बस स्थानकावरून सुरू झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग नंदकिशोर काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर कणकवली सर्विस रोड वरून तरंदळे फाटा येथून फिरून पुन्हा…

Read More

रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणसाठी निलेश राणे यांना साकडे

माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिले निवेदन मालवण (प्रतिनिधी) गोठणे आचरा मुख्य रस्ता ते यशवंत वाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे गावठण घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व्हावे, अशी मागणीचे निवेदन माजी उपसभापती राजू परुळेकर व इतर पदाधिकारी यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन राणे यांना सादर…

Read More

वेंगुर्लेत जबरदस्त मंडळाच्या रक्तदान शिबीरात 45 रक्तदात्यांचे रक्तदान

रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद ⚡वेंगुर्ले ता.१४-: जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ वेंगुर्ले राऊळवाडा यांनी “गरुडझेप” महोत्सवातंर्गत शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 45 जणांनी रक्तदान केले.जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा वेंगुर्लाने गरुडझेप महोत्सव 2023 अंतर्गत वेंगुर्ले साकव येथील मीना काँम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कलावलय वेंगुर्ले संस्थेचे अध्यक्ष…

Read More

कोळंब गावात ठाकरे शिवसेनेला धक्का

कातवड शाखा प्रमुखासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मालवण दि प्रतिनिधीकोळंब गावात शिवसेनेला धक्का बसला असून कातवड शाखाप्रमुख हनुमंत उर्फ हनु धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळंब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचा सरपंचसहित ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता आली होती. मात्र, काही दिवसातच शिवसेनेत…

Read More

सुरक्षित वाहन चालविण्यास सुरक्षा सप्ताहाचे फलित

पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे देवगड ता.१४-:रस्ते सुरक्षा हे आजच्या युवा पिढीच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून आजची युवा पिढी ही सुशिक्षित व सुजाण नागरिक आहे या युवा पिढीने वाहन परवाना घेऊन परिवहन विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रसंगी हेल्मेटचा वापर करून सुरक्षित वाहन चालविणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षा सप्ताह साजरा करत असताना अपघाताची मालिका खंडित…

Read More

बनावट दागिने कर्जप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलीस कोठडी

अद्यापही दुसरा संशयित फरारीच ! ⚡सावंतवाडी,ता.१४ बनावट दागिने देऊन एक शहरातील एका बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजारामपुरी-कोल्हापूर येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला काल ताब्यात घेण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली…

Read More

दाभोली येथे शेतक-यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१४-: तालुका कृषी अधिकारी कार्यालय-वेंगुर्ला, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य ग्रामसंघ, दाभोली यांच्या मार्फत दाभोली येथे १२ जानेवारी रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सुमारे ४५ जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Read More
You cannot copy content of this page