पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे
देवगड ता.१४-:
रस्ते सुरक्षा हे आजच्या युवा पिढीच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून आजची युवा पिढी ही सुशिक्षित व सुजाण नागरिक आहे या युवा पिढीने वाहन परवाना घेऊन परिवहन विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रसंगी हेल्मेटचा वापर करून सुरक्षित वाहन चालविणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षा सप्ताह साजरा करत असताना अपघाताची मालिका खंडित व्हावी. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी व स्वतःची काळजी देखील या रस्ता सुरक्षा सप्ताहात घ्यावी.त्याचबरोबर आपल्या नियमित जीवनात कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य याच्या आहारी न जाता आपल्या जीवनाबरोबर रस्ता सुरक्षिततेची ही अंमलबजावणी करावी. असे आवाहन देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी देवगड बस स्थानकावर विद्यार्थी रिक्षाव्यवसायिक, तसेच कर्मचारी यांचे समोर बोलताना केले. रस्ते सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत देवगड पोलीस स्थानक श्रीमती न.शा.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन देवगड महाविद्यालय ते देवगड बस स्थानक या मार्गावर करण्यात आले होते. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी विद्यार्थिनी समवेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उपप्राचार्य एस व्ही कुर्लीकर ,प्रा.शरद शेटे, ०प्रा.विनोद चिंदरकर, प्रा.आर एम. बांदेकर यांच्या समवेत पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र जाधव, पोलीस नाईक आशिष कदम पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील सहभागी झाले होते.
या रॅलीची सांगता देवगड बस स्थानकावर करण्यात येऊन या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी एसटी चालक, वाहक, रिक्षाव्यवसायिक यांना रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस .व्ही कुर्लीकर यांनी विद्यार्थ्यांनी परिवहन विभागाने दिलेल्या नियमांचे काटकर पालन करून सुरक्षित वाहन चालवावे व आपली व आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता जबाबदारी आपण पार पाडावी त्याचबरोबर रस्ता सुरक्षा सप्ताहाची जनजागृती ही आपल्या मार्फत समाजात करण्यात यावी. असे आवाहन केले .या प्रसंगी आगार व्यवस्थापक निलेश लाड, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक लहु सरवदे,कनिष्ठ सहाय्यक योगेश पांचाळ तसेच देवगड आगाराचे चालक, वाहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर. एस. बांदेकर आभार प्रा विनोद करंदीकर यांनी मानले.
फोटो- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत रॅलीत सहभागी महाविलयीन विद्यार्थी,पोलीस अधिकारी,प्राध्यापक व अन्य
