बनावट दागिने कर्जप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलीस कोठडी

अद्यापही दुसरा संशयित फरारीच !

⚡सावंतवाडी,ता.१४ बनावट दागिने देऊन एक शहरातील एका बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजारामपुरी-कोल्हापूर येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला काल ताब्यात घेण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

ॠतेश सुरेश माजिक (वय २६), असे त्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सागर नलावडे हा अद्याप पसार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

You cannot copy content of this page