⚡वेंगुर्ला ता.१४-: तालुका कृषी अधिकारी कार्यालय-वेंगुर्ला, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य ग्रामसंघ, दाभोली यांच्या मार्फत दाभोली येथे १२ जानेवारी रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सुमारे ४५ जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमात केळुस येथील प्रगतशिल शेतकरी लक्ष्मण वराडकर यांनी श्री पद्धतीने भात लागवडीचे फायदे, पद्धत, त्यातून होणारी खर्चाची बचत, पारंपारिक भात शेती व श्री पद्धतीने लागवड यांच्यातील फरक व फायदे विषद केले. कृषी पर्यवेक्षक देसाई यांनी भात, आंबा, काजू यांच्यावरील कीड रोग त्यांचे व्यवस्थापन तसेच पौष्टिक तृणधान्याचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. तालुका कृषी हर्षा गुंड यांनी कृषी विभागाच्या योजना सांगितल्या.
यावेळी खानोली सरपंच खानोलकर, दाभोली उपसरपंच डिसोजा, कृषी सहाय्यक लाडू जाधव, युएनडीपीचे समन्वयक कांबळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
